• November 1, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 31 ! “ही आपल्याकडे येणार …” – उत्कर्ष “ती चूक तू करू नकोस” – जय घरात बनतो आहे तिसरा गृप?

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 31 !        “ही आपल्याकडे येणार …” – उत्कर्ष                         “ती चूक तू करू नकोस” – जय                         घरात बनतो आहे तिसरा गृप?

मुंबई १ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक तिसराच गृप तयार होताना दिसत आहे आणि तो म्हणजे जय, उत्कर्ष आणि स्नेहा. घरामध्ये एकीकडे विकास बोलतो आहे की, त्या गृपला insecurity आहे तर दुसरीकडे उत्कर्ष आणि जयचा त्यांचा मुद्दा घरामध्ये नुकतीच एंट्री घेतलेल्या नीथासमोर मांडताना दिसत आहे. जय नीथाला सल्ला देताना दिसणार आहे तर उत्कर्ष तिला नक्की त्या दुसर्‍या गृपमध्ये काय सुरू आहे का त्यांची भांडण सुरू आहेत हे सांगताना दिसणार आहे.
 
उत्कर्ष नीथाला सांगता आहे, या बाजूला काय झालं आहे त्यांच्याकडे priorities असून किंवा त्यांच्या priorities जास्त आहेत ते त्याच फायदा नाही घेत आहेत. त्यांना संधी जरी मिळाली तरी एक दोन मिळते आणि यामध्ये ते बाकीच्यांना सेफ कसे करणार? त्यांच्यामध्ये भांडण आहेत मी बनणार की तू. त्यांच्यात काय भांडण सुरू आहे विकासला किंवा मीनलला कॅप्टन करा. जर मीनलला कॅप्टन बनायच आहे तर मीनलने तो स्टँड घ्यायला पाहिजे”. 
 
हाच मुद्दा  उत्कर्ष मांडत असताना जय देखील नीथाला सल्ला देणार आहे, जी चूक आदिशनी केली ती तू करू नकोस. जी त्याने शनिवारी मान्य देखील केली. सर मी एका आठवड्यात सगळं काही करायला गेलो.  नीथा उठून गेल्यावर जय, उत्कर्ष आणि स्नेहा मध्ये ही चर्चा सुरू राहिली, जय म्हणाला बघना आता मज्जा… फुटणार… उत्कर्ष म्हणाला ही आपल्याकडे येणार…  जय स्नेहाला म्हणाला, मी आज तिला एक पिल्लू सोडलं आहे माझे तर दोघेही सेफ आहेत…….”
 
बघूया नीथा तिचाच खेळ खेळणार की ती सदस्यांच्या बोलण्यात येऊन गृपला जाऊन मिळणार. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज आरतरी ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *