• November 1, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस – 31 ! “मी नाही तुटणार” – मीनल शाह “थोडीशी insecurity झाली आहे त्यांना” – विकास

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस – 31 ! “मी नाही तुटणार” – मीनल शाह “थोडीशी  insecurity झाली आहे त्यांना” – विकास

मुंबई १ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दुसर्‍या वाईल्ड कार्ड सदस्याची म्हणजेच नीथा शेट्टी – साळवी हिची एंट्री झाली. ती घरामध्ये जाण्यापूर्वीच चर्चा रंगली होती की, कोणत्या गृपला ती जॉइन होणार. काल महेश मांजरेकर यांनी विचारले असता तिने विकास आणि मीनल यांची चांगले स्पर्धक म्हणून नावे घेतली. आता घरात गेल्यानंतर तिच्याविषयी चर्चा चांगलीच रंगलेली दिसून येते आहे. आज विकास, मीनल, विशाल आणि सोनाली विविध विषयांवर चर्चा करताना दिसणार आहेत.


 
विकासचे म्हणणे आहे, थोडीशी insecurity झाली आहे. आणि त्यांना कळालं आहे की नीथा स्वत:हून यांच्याकडे गेली, आदिशपण यांच्याकडे गेला. मग होतय काय बाहेर ? कळलं का… सोनाली म्हणाली, गायत्री काय म्हणते माहिती आहे का… ही स्नेहा कॅप्टन्सीमध्ये  स्वत:बद्दल तीन वाक्य बोलणार आहे किती त्यांची बाजू घेते हे बघायचे आहे मला. मीनल म्हणाली आता हेच करायचं आहे, म्हणजे मी तरी तेच करणार आहे जे आहे ते खरं बोलणार आहे मी तर सांगितल उत्कर्षने ट्रायचं नाही केलं तुझ्या कॅप्टन्सीसाठी आमच्या हातात होतं तुला मिळालं असतं, आपण तेच बोलायच जे आहे त्यांच्या मनात… पण हेच आहे की ते तोंडावर बोलू नाही शकतं. आणि एक विशाल माझा इतका हात आणि पाय दुखतो आहे ना मला असं वाटतं आहे की असे नाही तोडत आहेत ना तर असे तोडायचा प्रयत्न करत आहेत पण मी नाही तुटणार.”


 
बघूया आज अजून काय काय घडले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बी गोस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *