- November 12, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 40 ! का आलं सोनालीला रडू ?
मुंबई १२ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनालीला अश्रु झाले अनावर… कोणामुळे सोनालीला इतके वाईट वाटले आहे ? नक्की काय झालं ? हे आज विकाससोबत सोनाली शेअर करणार आहे.
विकास सोनालीला समजावताना दिसणार आहे. विकासचं म्हणण आहे, “ठीक आहे मीनलच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. पण आता तुमच्या दोघींमध्ये काय नक्की, कुठल्या पॉइंटवरुन सुरू झालं आहे ? काय झालं आहे ? ते कळतचं नाहीये. ह्यांच्या बोलण्याने किंवा हे कसे react होत आहेत… आणि लोकांना जर हे दिसत आहे की तू genuine आहेस आणि तुला समोरून तितकसं मिळत नाहीये… तर उलट मग तुझा फायदा होतो आहे ना ? sympathy तुझ्याकडे येते आहे. ही पोरगी एवढी प्रयत्न करते आहे… त्यावर सोनाली काही वेगळंच म्हणाली, (गळ्यात घातलेली पाटी दाखवून) आणि हे वाक्य… किती मोठं वाक्य आहे हे ! त्यावर विकास म्हणाला, पण सोनाली हा चॉइस तुझ्याकडे होता ना, ते गळ्यात घालायचे की नाही… हा चॉइस तुझा आहे ना ? नाही म्हणू शकली असतीस…
बघूया आजच्या भागामध्ये अजून पुढे काय चर्चा होणार या दोघांमध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.