• November 8, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 36 ! नवा आठवडा नवे ट्विस्ट ! बिग बॉस मराठीच्या घरात न भूतो न भविष्यति अशी गोष्ट घडणार…

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 36 ! नवा आठवडा नवे ट्विस्ट ! बिग बॉस मराठीच्या घरात न भूतो न भविष्यति अशी गोष्ट घडणार…

मुंबई ८ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल तृप्ती देसाई बाहेर पडल्या. आता खेळ अजूनच रंजक होत चालला आहे. घरामध्ये ११ सदस्य उरले आहेत आणि यापुढे स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार आहे. नवा आठवडा सुरू झाला असून, आठवड्याच्या सुरुवातीलाच सदस्यांमध्ये भांडण, वादविवाद आणि नवे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत.

या आठवड्यात येणार सिझन मधला सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी तसंच काहीसं घोषित केले आहे. बिग बॉस यांनी जाहीर केले… “बिग बॉसच्या घरात ‘न भूतो न भविष्यति’ अशी गोष्ट घडणार आहे. कॅप्टन मीरा ठरवणार आहेत घरातील कोणते सदस्य या क्षणी घराबाहेर जाणार आहेत. 
 


आता नक्की घरामध्ये काय घडणार ? मीरा कोणत्या सदस्यांना निवडणार ? बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *