• September 29, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस आठवा ! “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये” – सोनाली पाटील विशाल देणार सोनालीला मोलाचा सल्ला !

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस आठवा ! “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये” – सोनाली पाटील                                             विशाल देणार सोनालीला मोलाचा सल्ला !

मुंबई २९ सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कधी कधी सदस्यांना कळत नाही नक्की कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोण आपल्या बाजूने बोलतं आहे. किंवा कोणाच्या दबावामुळे एखादा सदस्य एकदम शांत होतो आणि ही गोष्ट घरातील इतर सदस्य पाहत असतात. अशावेळी ग्रुपमधले सदस्य, घरातील मित्र काही मोलाचा सल्ला देतात ज्यामुळे पुन्हा एकदा उभारी येते. तसंच काहीसं आज देखील होणार आहे. आज विशाल, सोनाली आणि मीनल याबद्दलचं बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये विशाल सोनालीला मोलाचा सल्ला देणार आहे. घरामध्ये असं कोणी तरी हवं ज्याच्या बरोबर तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता, जो तुम्हाला सल्ला देखील देऊ शकेल.
 
सोनाली तिच्या मनातील गोष्ट आज विशाल आणि मीनलला सांगताना दिसणार आहे. सोनाली विशाल सांगणार आहे, “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते. विशाल सोनालीला सांगणार, आहे “तू नको हाऊस. तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का? टास्कमध्ये तुझं काम होतं तिकडच्या पोरांना खिळवून ठेवायला हवं होतंस. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हांला माहिती आहे तुझी मेंटल परिस्थिति काय आहे. आम्ही समजू घेऊ. पण, बाहेर प्रेक्षकांना काय दिसतं असेल सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले आणि दुसर्‍या आठवड्यात फूल डाऊन. तू मध्ये कुठेच दिसत नाहीस. तुला जोडी दिल्यापासून तू… विकासला देखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतो आहे. ही कोणाची नाही तुला कळलं आहे ना मग काही फरक पडत नाही”.
 
आता नक्की हे कोणाबद्दल बोलत आहेत ? कोणामुळे सोनालीला त्रास होतो आहे ? विशाल कोणाबद्दल बोलतो आहे? हे कळेलच आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *