- October 20, 2022
बिग बॉस मराठी सिझन चौथा – दिवस १८ ! “विकासचा रोबॉट झाला आहे” – मेघा घाडगे

मुंबई २० ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज योगेश आणि यशश्री समोर मेघा घाडगे विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. मेघा यांचे म्हणणे आहे, वीकेंडला देखील मी बोले विकास मी तुला समजावत होते तर तुला कळलं नाही पण या लोकांचं तुला कळलं. पण तू एकदाही appreciate केलं नाहीस कि मेघाताई मला पहिल्या दिवसापासून समजावत होती. विकास इथे खेळायला आला आहेस तू हे ऐकायला नाही आलास.
प्रवचन आणि शिबिरं भरवायला बाहेर आहे वेळ तुला. मी हे पण बोलून झालं कि, हि गोष्ट आज ना उद्या ह्यांच्यावर पण फिरणार आहे जी झाली. हे आमचं बोलणं झालं आणि तेच घडलं आहे. ते काय करत आहेत मला माहिती नाही… ते काय खेळत आहेत मला कळतं नाहीते. विकासचा ROOBOT झाला आहे. ते सतत कानाशी असतात”.
अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.