• November 11, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 38 ! काय असेल उत्कर्षचा निर्णय ?

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 38 ! काय असेल उत्कर्षचा निर्णय ?

मुंबई ११ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच… कॅप्टन्सी कार्याची वाट घरामध्ये प्रत्येक सदस्य बघत असतो… कारण, यातूनच घराला मिळतो नवा कॅप्टन, आता या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला काय गमवावं लागणार आहे? सदस्य ते करण्यास तयार होतील ? हे कळेलच आजच्या भागामध्ये.


 
बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या आजसमोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, “उत्कर्ष कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आणि ती गोष्ट आहे… हे सांगताच जयला अश्रु अनावर झाले.. असं काय आहे जे उत्कर्षला गमवाव लागणार आहे ? उत्कर्ष जयसाठी तयार होईल ? काय असेल त्याचा निर्णय… 


 
जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *