• November 10, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 38 ! कोण धरणार कोणता दांडा…

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 38 ! कोण धरणार कोणता दांडा…

मुंबई १० नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य सध्या सुरू आहे. ज्यामध्ये काल बराच राडा झाला. गायत्री, नीथा, स्नेहा, विकास आणि दादूस हे कार्यामधून बाहेर पडले. आज कार्यामध्ये काय काय घडणार ? कोण बाहेर पडणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मीरा, नीथा, विकास आणि गायत्री यांनी काल टास्क चांगलाच गाजवला.


 
आज उत्कर्ष, विकास, विशाल, जय हे प्लॅनिंग करताना दिसणार आहेत. कोण कोणता दांडा पकडणार, कुठला दांडा बाद करायचा आणि कुठला दांडा काढणे फायदेशीर आहे ? यावर यांची चर्चा बरीच रंगली. बघूया या टास्कमध्ये आज काय होणार ? कोण ठरणार कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. काल गायत्री आणि मीराची उत्कर्षसोबत टास्क दरम्यान वादावादी झाली. गायत्रीच्या सांगण्यावरुन मीराने उत्कर्षवर आरोप केला ज्यावर उत्कर्षला दोघींचा राग आला विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. बघूया आज काय घडणार…


 
बघूया आजच्या भागामध्ये.तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *