• November 9, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37 ! मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण… मीरा VS स्नेहा

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37 ! मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण… मीरा VS स्नेहा

 
मुंबई ९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांच्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला. घरातील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होतात, काही सदस्य घरातील नियमभंग करतात, काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखविली जाते अशा सदस्यांची नावे काल मीराला द्यावी लागली ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावं होते. आजदेखील मीराला अशीच नवे द्यायची आहेत. आणि त्यावरून मीरा आणि घरातील काही सदस्यांमध्ये वाद होणार आहे.


 
मीरा म्हणाली, स्वत: ट्राय नाही कारायचा. जय म्हणाला, स्वत:ला ट्राय काय नाही करायचे, आम्हीच ट्राय केले. जरा बघा डोळे उघडा आणि कान पण उघडा… त्यावर मीराचे म्हणणे आहे तुम्ही प्रयत्न नाही केला. विकासने देखील यावर त्याचे म्हणणे मांडले ट्राय करण्याच्या बाबतीत तुम्ही जी तीन नावे दिली आहेत त्यांनी सर्वात जास्त ट्राय केलं आहे असं मला अजूनही वाटतं आहे. जे लोकं सर्वात जास्त बोले आहेत तेच तळ्यात आहेत. बाहेरून दिसताना हेच दिसणार आहे जे लोकं सर्वात जास्त बोले त्यांनाच तुम्ही शिक्षा देत आहात. या वादात स्नेहा आणि मीरामध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी अडणार आहे. मीराचे म्हणणे आहे इथे समोर येते मी तेव्हा बोलायचे. स्नेहा बोलत असताना मीरा बोलत होती त्यावर स्नेहा म्हणाली ए थांब… मीरा तिला म्हणाली… थांब नाही बोलायच मला… स्नेहा म्हणाली, मी तेव्हाच बोले… मीरा म्हणाली, तेच तेच परत बोलून काहीच होणार नाहीये, जरा काहीतरी नवीन शोध. नक्की हा वाद कशावरून झाला ? बघूया आजच्या भागामध्ये.  


 
बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *