- November 5, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 35 ! “त्या खूप फ्लिप मारतात” – मीनल ! ते स्वत:साठी खेळत होते – तृप्ती देसाई…
मुंबई ५ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे घरातील समीकरण पुर्णपणे बदलल्याचे दिसून येते आहे. मीनलवर विशाल, सोनाली आणि विकास नाराज आहेत तर दुसरीकडे उत्कर्ष, जय, मीरा आणि गायत्रीचा ग्रुप तुटला आहे असे दिसून येते आहे. कारण गायत्रीने हे स्पष्ट सांगितले की तिला यांच्यासोबत खेळण्याची इच्छा नाहीये, तर मीरा म्हणाली मी उत्कर्षवर कसं विश्वास ठेवणार. आता कालपासून स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील काहीतरी बिनसल्याचे दिसून येत आहे. काल दोघींमध्ये बरीच वादावादी झाली. आज एकीकडे तृप्ती देसाई मीरा आणि गायत्रीला स्नेहाबद्दल तर दुसरीकडे स्नेहा तृप्ती देसाईंबद्दल मीनलशी बोलताना दिसणार आहे.
तृप्ती देसाई मीरा आणि गायत्रीला सांगताना दिसणार आहेत, ते सगळेच स्वत:साठी खेळत होते. मीरा त्यावर म्हणाली, ते सगळ्यात आधी स्वत:चा विचार करतात. तृप्ती देसाई म्हणाल्या, मला माहिती नव्हतं पहिले नावं कोणाचे… आपलं देखील काहीही ठरलेलं नव्हतं. स्नेहा म्हणते नक्की ताई ? मी म्हंटल तुम्ही कॅप्टन आहात, काल पण होती ती कॅप्टन… मग कशाला… दुसर्याला संधी मिळालीच पाहिजे.
तर दुसरीकडे स्नेहा मीनलला सांगणार आहे, विरुध्द टीममध्ये असूनसुध्दा आम्ही त्यादिवशी रात्री गप्पा मारत होतो. दुसर्या दिवशी या मीरा – गायत्रीला सांगतात स्नेहासमोर काही बोलू नका ती तिकडे त्यांच्या टीममध्ये जाऊन सांगेल. मी असं कधी करत नाही. गेमच्या गोष्ट मी कशी सांगणार. मीनल त्यावर म्हणाली, खूप फ्लिप मारतात त्या.”
बघूया आज कोणीत्या सदस्यांनी कोणत्या सदस्यांच्या चुगल्या केल्या… तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.