- November 1, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 31 ! कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सेफ ?

मुंबई १ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे नॉमिनेशन कार्य. यावेळेसच नॉमिनेशन कार्य जरा इंटरेस्टिंग असणार आहे. कारण देखील असंच आहे… मागील आठवड्यात बर्याच गोष्टी घडून गेल्या आहेत, जे अजूनही बरेच सदस्य विसरले नाहीयेत. कुठेतरी त्याचे पडसाद आजच्या कार्यावर पडणार हे नक्की. कोणता सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार ? आणि कोण सेफ होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी सांगितले, “आज बिग बॉसच्या घराला साजेस असं तोरण लागणार आहे. ज्या सदस्यांचे फोटो तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील.”
बघूया आज कोण कोणाला करणार नॉमिनेट आणि कोण होणार सेफ. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.