- October 29, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 30 ! “मी रावण आहे” – विकास पाटील कोण होणार घराचा नवा कॅप्टन – तृप्ती देसाई की स्नेहा वाघ ?
मुंबई २९ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क सुरू झाला. टीमने स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित केले. आता या दोघींमध्ये कोण बनणार घरचा नवा कॅप्टन ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बरीच वादावादी बघायला मिळाली. घरामध्ये जरी दोन स्ट्रॉंग गृप असले तरीदेखील गृपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही. मीरा आणि गायत्रीच्या संभाषणावरून हे कुठतेरी स्पष्ट झाले. तर विकास आणि विशालमधील वाद बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे असे दिसून येते आहे. कालदेखील विकास जेव्हा विशालकडे टास्कबद्दल बोलायला गेला तेव्हा विशालने त्याला योग्य ते उत्तर न दिल्याने विकासला वाईट वाटले. आज देखील दोघांमध्ये वाद होणार आहे. आता नक्की या वादाचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी बघा आजचा भाग.
विशाल विकासला म्हणाला, दोन तोंडाचा वापर नको रे एक ठाम मत दे. त्यावर विकास म्हणाला, दोन नाही दहा तोंड आहेत मला… मी रावण आहे. विशाल म्हणाला, रावणाचा शेवटी अंत झाला हे लक्षात ठेव. विकास म्हणाला, ठीक आहे चालेल अंत प्रत्येकाचा आहे, अमर कोणी नाहीये इथे सगळे मारायला आले आहेत. मरेन पण दहा तोंड असलेला रावण म्हणून मरेन, तुझ्यासारखा सामान्य माणूस म्हणून मरणार नाही. विशाल म्हणाला, “मी सामान्य माणूस आहे आणि मी खुश आहे….” हा वाद पुढे असाच वाढत राहिला… आता हा वाद टास्क दरम्यान झाला ? कश्यावरून झाला ? याचे कारण आजच्या भागामध्ये समोर येईलच.
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर