• October 5, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस बारावा “उत्कर्षला शब्द पाळावाच लागेल” – विकास पाटील

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस बारावा “उत्कर्षला शब्द पाळावाच लागेल” – विकास पाटील

मुंबई ५ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात आज नवा टास्क रंगणार आहे “माझे मडके भरी”. या टास्कसाठी देखील सदस्य दोन गृप्स मध्ये विभागले जाणार आहेत. याच मुद्द्यावरून आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. मीनल, विकास, सोनाली आणि आविष्कार मध्ये.ज्यामध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी उमेदवारी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांच्या बोलण्यावरून समजते.


 
या संभाषणात मीनल सांगताना दिसणार आहे, “आता जो टास्क आहे त्यामध्ये देखील दोन गृप्स असणार आहेत.आणि यानंतर कॅप्टन्सी टास्क होणार ज्यामध्ये दोन उमेदवार निवडले जाणार. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण तसंही त्याला डील करायला खूप आवडत. त्याला सांगायच की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टन्सी टास्कसाठी तुम्ही माझं नावं देखील द्या. म्हणजे एक त्यांच्या ग्रुपमधला आणि एक आपल्या ग्रुपमधला अशी बरोबर कॉम्पटिशन होणार. विकासचं म्हणण पडलं “उत्कर्षला जर डील दिली तर एक तर तो नाही म्हणेल पण जर तो हो म्हणाला तर त्याला शब्द पाळावाच लागेल कारण त्याला डबल ढोलकी म्हणून नावं आहे आता already”.


 
बघूया पुढे काय टास्कमध्ये… तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *