- October 2, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस दहावा ! मला स्वत:चा निर्णय घेऊ दे ! – विशाल निकम “मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही” – गायत्री दातार
मुंबई १ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात आज “ खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य रंगणार असून घराला दूसरा कॅप्टन मिळणार आहे. जय आणि गायत्री या दोघांमध्ये कोणी एक बनणार आहे घराचा कॅप्टन. घरातील नाती दर दिवसाला बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येत नाही. आजच्या होणार्या टास्कबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्याच चर्चांना उधाण आल्याच दिसून येते आहे. प्रत्येकजण आपला मुद्दा दुसर्याला पटवण्यात गुंग आहे. सदस्य नक्की कोणाच्या बाजूने उभे रहाणार ? कोणाला घराचा नवा कॅप्टन बनवणार ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहेच.
याचविषयी आज विशाल आणि गायत्रीमध्ये चर्चा रंगणार आहे. विशाल गायत्रीला विचारताना दिसणार आहे, “तुझं काय मत आहे. ज्या ज्या गोष्टी झाल्या खेळात… तुझ्यावर अन्याय झाला, तुमचीच लोकं… हे झालं नाही पाहिजे. मला नाही वाटतं माझी कुणाला मत द्यायची इच्छा नाहीये. जय तर आलाच नाही माझ्याकडे मत मागायला तर तो विषयच संपला. मला स्वत:चा निर्णय घेऊ दे ! जो काही असेल तो तुला दिसेलच. गायत्री विशालला सांगणार आहे, “माझ्यावर विश्वास ठेव, मला इतकचं सांगायच आहे की, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही”.
पुढे काय होत जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.