- October 1, 2021
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस दहावा ! “टास्कमध्ये तू जे माझ्यावर टाकलसं ना ते मला चार दिवस आठवतं आहे” – सुरेखा कुडची
मुंबई १ ऑक्टोबर, २०२१ : कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रम आणि त्यामधले वेगवेगळे टास्क यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगते आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. आणि या टास्कसाठी टीम A मधील सदस्यांनी जय आणि गायत्री या दोन उमेदवारांची नावे दिली आहेत. या टास्कसाठी देखील सदस्य तितक्याच मेहनतीने लढत देणार यात काहीच शंका नाही. पण, ती हिंदीमध्ये कहावत आहे ना, “अब आया ऊँट पहाड़ के नीचे” तशी गत होणार आहे. हल्लाबोल या टास्कसाठी दोन्ही टीममधल्या सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. जय आणि गायत्रीने टीम B मधून आलेल्या दोन्ही जोड्यांना मोटार बाईकवरून उठवण्यासाठी बरीच मेहनत घेतली, खूप काही ऐकवले. आज जय आणि गायत्रीला कॅप्टन बनण्यासाठी याच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तो पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना घरातील सदस्यांना पटवून द्यायचे आहे की, ते उत्तम कॅप्टन कसे आहेत आणि इतर सदस्यांनी त्यांना त्यांचे मत का द्यावं. अत्यंत कठीण दिसणारा हा टास्क कसे सदस्य पार पाडतील ? कोण बनेल घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
जय आज सुरेखाताईंना मनवताना दिसणार आहे. जय ताई ताई करत त्यांना विनंती करताना दिसणार आहे. त्यावर सुरेखाताई म्हाणल्या, “अच्छा ताई ? मध्ये काय काय झालं आहे माहिती आहे ना ? मला विचार करू दे… पहिली दुश्मन आहे मला सॉरी म्हणून माझ्या आंगावर कचरा टाकणारी. गायत्री त्यावर म्हणली बघाना ताई मी किती गोड आहे… जयने पण संधी साधली बघा मी कचरा नाही टाकला. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत आहे. मी विचार करते थोडा. ते तुमच्यात काय करतात ना “डील” काय असेल डील ? मला आवडलं हे खूप डील… तू जर जिंकलास तर तुझे अर्धे पैसे मला देशील”. बघूया सुरेखाताईंचे मत कोणाला मिळणार ?
तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.