• September 20, 2021

बिग बॉस मराठी सिझन ३ चा पहिला दिवस !

बिग बॉस मराठी सिझन ३ चा पहिला दिवस !

पार पडली तिसर्‍या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया

मीरा जगन्नाथ आणि स्ंनेहामध्ये होणार भांडण ?

 
मुंबई २० सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठी सिझन ३ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली… स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती… आणि काल संध्या ७ वाजता यासगळ्यावरून पडदा उघडला … महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली… स्ंनेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले…याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई ( Social activist Tripti Desai ) यांची एंट्री झाली. याशिवाय तरुण कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची देखील एंट्री झाली. सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले…बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जय मध्ये होणार भांडण …तसंच मीरा आणि स्ंनेहामध्ये बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय मला डोक आहे”. तर स्नेहाने मिराला खडसावले “ही काय पध्दत आहे का बोलायची” ? घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेत असणार आहे…मीरा आणि स्ंनेहा तसेच मीरा आणि जयमध्ये वाद कशा वरून झाला ? पुढे काय झालं ? हे आजच्या भागामध्ये कळेल…

पहिल्या नॉमिनेशन द्वारे लढाईचा प्रारंभ होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ? हे बघणे रंजक ठरणार आहे… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन ३ रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *