• January 15, 2026

Bigg Boss Marathi 6: After the Controversy, Tanvi Kolte Breaks Down – What Happened?

Bigg Boss Marathi 6: After the Controversy, Tanvi Kolte Breaks Down – What Happened?

पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

‘बिग बॉस मराठी’चे नवीन सीझन ६ सुरू होताच घरामध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. नॉमिनेशन टास्क दरम्यान तन्वी आणि सागर कारंडे यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आणि त्यामुळे तन्वी ढसाढसा रडली असावी अशी शंका नाकारता येत नाही. याच वादाच्या वातावरणात घरात एक अतिशय भावनिक क्षण पाहायला मिळाला. मागील काही भागांपासून तन्वी आणि सागर यांच्यात काही कारणावरून खटके उडताना दिसत होते. मात्र, प्रोमोमध्ये असे दिसते की, तन्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तन्वी इतकी भावूक झाली होती की तिला रडू आवरणे कठीण झाले होते. सदस्यांनी तन्वीला सावरले.

तन्वीला अशा प्रकारे रडताना पाहून घरातील इतर सदस्यांनी त्यांचे मतभेद विसरून तिच्याकडे धाव घेतली. घरातील सदस्य तिला शांत करताना आणि तिचे सांत्वन करताना दिसत आहेत. सागर कारंडे म्हणाला, बिचारी… मला वाईट वाटतं आहे तिचं… खरंच ती हे सगळं इतरांना सांगते ना, एकदा मला येऊन बोली असती ना पूर्ण हलकं केलं असतं मी तिला… ”

पुढे बिग बॉसच्या घरात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
इंस्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी एक्सक्लूसिव्ह अपडेट्स @ColorsMarathi पेज वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #RiteishDeshmukh @jiohotstarreality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *