• October 1, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस दहावा ! “आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल” – गायत्री दातार

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस दहावा ! “आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल” – गायत्री दातार

मुंबई १ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या “हल्लबोल” टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम A आणि टीम B मधून टीम A चा विजय झाला. मोटर बाईक जय आणि गायत्री बसले होते. कार्याचा संचालक उत्कर्ष biased खेळला असं मत टीम B मधल्या सदस्यांनी मांडल आणि त्याच्या निर्णयाचा निषेध केला. टीम A या कार्यामध्ये विजजी ठरली आणि यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉस यांनी विजेत्या टीमला दिला. विचारविनिमयानंतर जय आणि गायत्री ही दोन नावे पुढे आली. आणि आज या दोघांमध्ये रंगणार आहे “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांविरुध्द भिडताना दिसणार आहेत.तेव्हा बघूया कोण या कार्यात जिंकणार ? कोणाला मिळणार कॅप्टन होण्याचा बहुमान ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.


 
बिग बॉस मराठीच्या घरात कधी कोणत्या सदस्याला कोणाची गरज कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप विचार करून बोलणं, वागणं अतिशय महत्वाचे असते. या घरात सगळंच अनिश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचचं उदाहरण म्हणजे आज विकाससोबत गायत्री चर्चा करताना दिसणार आहे. हल्लाबोल या टास्कमध्ये जे घडलं ते आपण पहिलंच. गायत्री विकासला सांगणार आहे, “जर मी कॅप्टन बनले तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतत मी ठेऊ शकते. टास्कच्या वेळेसचा आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही, आणि फेरप्ले मी करू शकते असं मला वाटतं. जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्याच्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही तुझ्या डोक्यात काही नाही”. विकासने तिला सांगताना दिसणार आहे, “जर अशी कुठली वेळ आली आणि मला तुझी गरज लागली as a captain तर तू मला साथ देशील का ? गायत्री त्याला सांगणार आहे माझ्याकडे असं कोणीच अजून तरी मागितलेलं नाहीये तर मी नक्की प्रयत्न करेन तसं करण्याचा”.
 
बघूया पुढे काय होतं आजच्या भागामध्ये तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *