- January 15, 2026
Bigg Boss Marathi 6: I Don’t Have Anything to Prove – Who I Am and Who I’m Not, Says Dipali Sayyed!
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व सुरू होताच घरात वादाची ठिणगी पडली आहे. विशेषतः तन्वी कोलते सध्या घरामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तन्वीचे दोन मोठे राडे पाहायला मिळाले एक दीपाली सय्यदसोबत आणि दुसरा सागर कारंडेसोबत. पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
दीपाली सय्यद आणि तन्वीमध्ये जुंपली
घरात कामाच्या वाटणीवरून आणि ड्युटीवरून तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यात तीव्र वाद झाले. कामाच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये खटके उडालेले पाहायला मिळाली. या दोन्ही वादामुळे घरातील इतर सदस्यही थोडे अवाक झाले आहेत.दीपाली सय्यद आणि तन्वी कोलते यांच्यातील शाब्दिक चकमक होताना बघायला मिळणार आहे. दीपाली सय्यद म्हणाली की, ” मी जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते आणि जिथे तुमचं मतं आहे ना ते मांडा आणि तिथे तुम्ही ठाम राहा. तन्वी कोलते त्यावर म्हणाली, “नाही! नाही! हे कॅमेऱ्याला दिसेल… तू फक्त एवढंच बोललीस, ही पण तशीच वागत असेल तर सांग… ती त्याच्याकडे बघून बोलली नव्हती. अरे यार! कसं चालू करतात यार… कशाला? मला माहीत नव्हतं की एवढा तमाशा करतील एवढ्याशा गोष्टीवर… सॉरी, आज मकर संक्रांत आहे म्हणून मी सगळ्यांशी गोड बोलले, मला काय माहीत होतं हे असं वाकड्यात जातील.ज्यांना वाकड्यात जायचं आहे त्यांनी वाकड्यातच जावं … दीपाली सय्यद त्यावर बोलताना म्हणाली “तुम्हाला प्रूफ करायचंय! मला काही प्रूफ नाही करायचंय मी काय आहे आणि काय नाहीये ते. तिचे म्हणणे आहे मी मान देते, मी मोठ्यांना मान देते. तुला आदर घेता येत नाही… तू मोठी आहेस तुला हे कळत नाही का? अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का? तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा कुजबुज करायची हे काय आहे?” तन्वी कोलते रोशनची बोलताना म्हणाली “असं करून जर मी वाईट होणार असेल, तर मी वाईटच बरी आहे बाबा!”
‘बिग बॉस’च्या घरात आता नवीन ग्रुप्स आणि समीकरणं तयार होताना दिसत आहेत. पुढे बिग बॉसच्या घरात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
इंस्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी एक्सक्लूसिव्ह अपडेट्स @ColorsMarathi पेज वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #RiteishDeshmukh @jiohotstarreality